Saam Tv
सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये अनेकांना सर्दी-खोकला, घशाला खवखव अशा समस्या जाणवू लागल्यात.
घरामध्ये अशा परिस्थित रामबाण उपाय म्हणजे हळदीचं दूध आहे.
हळदीच्या दुधात कर्क्युमिन नावाचा घटक असतो.
हळद घशाची खवखव आणि सूज कमी करण्यास मदत करते.
गरम दूध प्यायल्यास श्वसन मार्ग मोकळा आणि स्वच्छ होतो.
एक कप गरम दूधामध्ये अर्धा चमचा हळद टाका.
चवीसाठी त्यात मध, सुंठ किंवा काळी मिरीचा समावेश करू शकता.
जर तुम्हाला दूध पचत नसेल, तर पाणी, बदाम दूध किंवा कोकोनट मिल्कमध्येही हळद टाकून तुम्ही सेवन करू शकता.