Manasvi Choudhary
गाजर खायला सर्वानाच आवडतात. गाजरमधील व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, बीटा, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह ही पोषक घटक असतात.
पावसाळ्यात गाजरचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक ती पोषणतत्वे मिळतात. गाजरचे सॅलड, गाजरची कोशिंबीर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल पण तुम्ही कधी गाजरची भाजी खाल्लीये का?
गाजरची भाजी ही चविष्ट रेसिपी आहे. घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने गाजरची भाजी बनवू शकता.
गाजर भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी गाजर बारीक कापून घ्या. गॅसवर एका पातेल्यामध्ये गाजर चांगले शिजवून घ्या.
गाजरच्या भाजीमध्ये पाणी मिक्स करा. भाजी पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
भाजी शिजली की त्यात मसाला, हळद आणि मीठ हे टाका. कोरडे तांदळाचे पीठ या भाजीमध्ये मिक्स करा.
अशाप्रकारे घरच्या घरी गरमा गरम गाजरची भाजी तयार होईल.