Manasvi Choudhary
टपरीवरचा स्पेशल कडक मसाला चहा प्यायला सर्वाना आवडतो.
मसाला चहा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मसाला चहा बनवण्यासाठी काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ, सुंठ पावडर, दूध, पाणी, साखर, मसाला, चहा पावडर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम मिरी, लवंग, दालचिनी हे सर्व खडे मसाले एकत्र करा.
गॅसवर एका पॅनमध्ये सर्व मसाले एकत्र करून हलकेसे परतून घ्या
मसाले परतून झाल्यानंतर थंड करा आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यात घाला यामध्ये सुंठ पावडर आणि जायफळ घालून बारीक करा.
अशापद्धतीने घरगुती चहाचा स्वादिष्ट मसाला तयार झाला आहे.
गॅसवर एका भांड्यात पाणी घ्या नंतर चहा पावडर घालून उकळून घ्या.
नंतर दूध घालून चांगले उकळून घ्या.
चहाला छान रंग आल्यावर साखर आणि चहा मसाला घाला.
अशापद्धतीने मसाला चहा सर्व्हसाठी तयार आहे.