Manasvi Choudhary
उन्हाळ्यात शरीराला थंड वाटणाऱ्या पदार्थाचे सेवन करणे गुणकारी मानले जाते. दही थंड असते. दहीचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात पोटातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही दही भात या रेसिपीचा आहारात समावेश करू शकता.
दही भात बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तांदूळ, दही, तेल, हिरवी मिरची, आलं, धने, राई, चणा डाळ, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची, मीठ हे साहित्य तयार ठेवा.
सर्वातआधी दही भातासाठी तुम्हाला एका मोठ्या भांड्यात ताजे दही चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे. दही घट्ट असू नये लक्षात घ्या.
नंतर या दहीच्या मिश्रणात भात मिक्स करा. यात हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालू एकजीव करा.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये राई, चणाडाळ, हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या हलक्या परतून घ्या.
तडका दिल्यानंतर तुम्ही यात दही भात मिक्स करा. संपूर्ण मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करा. अशाप्रकारे घरच्या घरी स्पेशल तडका दही भात तयार होईल