Manasvi Choudhary
उन्हाळ्यात बाजारात टरबूज आणि खरबूज हि दोन्ही फळे असतात. उन्हाळ्यात या दोन्ही फळांचे सेवन आरोग्यासठी फायदेशीर मानले जाते.
मात्र या दोन्ही फळांच्या नावामध्ये अनेकांचा गोंधळ होतो त्यामुळे खरबूज आणि टरबूज यातील फरक जाणून घेऊया.
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची कमतरता कमी झाली असेल तर तुम्ही या दोन्ही फळांचे सेवन करू शकता.
टरबूज आणि खरबूज या दोन्ही फळांमध्ये ९० टक्यांपेक्षा अधिक पाण्याचे प्रमाण असते यामुळे शरीर हायड्रेट राहते.
खरबूजमध्ये प्रथिन्यांचे प्रमाण टरबूजच्या तुलनेने अधिक असते यामुळे खरबूज खाल्ल्याने स्नायूंना फायदा होतो.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही खरबूज आणि टरबूज हे दोन्ही फळे खाऊ शकता. या दोन्ही फळांमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.