Sakshi Sunil Jadhav
घरात कांदे-पोहे, इडली अशा प्रकारचे नाश्ते आपण बनवत असतो. अशावेळेस चटणी कशी बनवायची बनवायची याचं उत्तर वाचून घ्या.
किसलेला ओला नारळ, कोथिंबीर, सोललेले चणे, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, मीठ, लिंबाचा रस
तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता इ.
सर्वप्रथम ओला नारळ किसून घ्या आणि एका मिक्सरचा भांड्यात ठेवा.
आता मिक्सरमध्ये कोथिंबीर, सोललेले चणे, मिरची, लिंबाचा रस आणि थोडं पाणी टाका.
आता त्याचे वाटण करा. चटणी जास्त पातळ होऊ देऊ नका.
आता त्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून पुन्हा मिक्सरला वाटण फिरवा.
संपुर्ण साहित्य आता एका वाटीत काढून घ्या.
तेल, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करून चटणीवर टाकून नाश्त्यासोबत सर्व्ह करा.