Siddhi Hande
सोलापूरची शेंगदाण्याची पोळी खूप फेमस आहे. शेंगदाण्याची पोळी तुम्हा काही दिवस साठवूनदेखील ठेवू शकतात.
शेंगदाण्याची पोळी ही शेंगदाणे, गूळ आणि तिळाचा वापर करुन बनवली जाते. हे शरीरासाठी खूप पौष्टिक असते.
सर्वात आधी तुम्हाला पीठ मळून घ्यायचे आहे. त्यासाठी गव्हाचे पीठ घ्या. त्यात मीठ आणि पाणी टाकून मस्त मऊसर पीठ मळून घ्या.
सारण तयार करण्यासाठी शेंगदाणे मिक्समध्ये बारीक करुन घ्या.
त्यानंतर गूळ, तीळ, वेलची, जायफळ फूड आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र करुन घ्या.
यानंतर गव्हाच्या पीठाचे लहान गोळे करा.
यावर सारण लावा त्यानंतर पुन्हा एका बाजूने पीठ लावून मस्त लाटून घ्या.
यानंतर तव्यावर तूप टाकून मस्त खरपूस भाजून घ्या.
ही शेंगदाण्याची पोळी तुम्ही आठवडाभर साठवून ठेवू शकतात.