Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात काही तरी गरमा गरम आणि झणझणीत खाण्याचा बेत आखत असाल तर मिसळ पाव आहेच.
तुम्ही घरच्या घरी असलेल्या साहित्यात अगदी हॉटेलसारखी मिसळ तयार करू शकता.
मटकी, कांदा, मीठ, टोमॅटो, फरसाण, मसाला, हळद, मीठ, मिसळ पाव मसाला, पाव, तेल इ.
सर्वप्रथम मटकी धुवून त्यात हळद, मीठ मिक्स करा.
आता कुकरमध्ये मटकी चांगली शिजवून घ्या.
आता फोडणीसाठी तेल गरम करा.
फोडणीसाठी कांदा, कढीपत्ता, टोमॅटो परतून घ्या.
पुढे लसणाची पेस्ट आणि सर्व मसाले मिक्स करून परता.
आता त्यामध्ये मटकी घालून मिक्स करा.
मिसळ एका वाटीत घेऊन त्यामध्ये फरसाण, कांदा घालून गरमा गरम सर्व्ह करा.