Sakshi Sunil Jadhav
रस खापरोळी ही कोकणातली प्रसिद्ध गोड पदार्थांची रेसिपी आहे.
फार पुर्वीपासून कोकणामध्ये खापरोळी हा पारंपारिक पदार्थ बनवला जातो. पुढे आपण त्याची रेसिपी जाणून घेऊया.
तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ, पाणी, हळद, जिरे, पूड, तूप, नारळ, गूळ, वेलची पूड, मेथी दाणे इ.
तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ अर्धी वाटी घ्या. ती पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या. पीठ पुन्हा ४ तास झाकूण ठेवा.
पिठामध्ये हळद, जिरे पूड घालून ढवळा.
नारळाचे दूध घ्या. त्यात किसलेला गूळ, वेलची पूड ढवळून घ्या.
आता गॅसवर तवा गरम करा. तेल लावा आणि एक चमचा पीठ तव्यावर पसरवा.
खापरोळी छान जाळीदार होण्यासाठी तूप कडेने सोडा. ती दुधात टाकून सर्व्ह करा.