Manasvi Choudhary
महाराष्ट्रात संस्कृतीत सणउत्सवात, कार्यक्रम असला की पुरणपोळी बनवली जाते.
पुरणपोळी बनवण्यासाठी चणा डाळ, तूप, गूळ, जायफळ, वेलची, मीठ, गव्हाचे पीठ, तेल हे साहित्य घ्या.
पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम चणाडाळ स्वच्छ धुवून ३ तास पाण्यात भिजत ठेवा.
यानंतर कुकरमध्ये भिजलेली चणाडाळ, हळद , मीठ आणि एक चमचा तेल घाला.
डाळ शिजल्यानंतर त्यातील पाणी काढावे. नंतर ही डाळ वाटून घ्या.
यानंतर गॅसवर एका कढईत डाळीचे वाटण आणि गूळ घालून दोन्ही मिश्रण परतून घ्या.
नंतर या मिश्रणात जायफळ पावडर आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करा.
मिश्रण नीट शिजल्यानंतर सारण थंड होऊ द्या. एका भांड्यात गव्हाचे पीठ आणि मैद्यामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्या.
पीठ मळताना यामध्ये एक चमचा तेल घाला म्हणजे पीठ मऊ होईल.
नंतर या पीठाचा गोळा पुरीच्या आकाराचा करा यामध्ये मध्यभागी पुरण घाला.
पुरण भरून कणकेचा गोळा करा आणि चपातीप्रमाणे लाटून घ्या.
गॅसवर पॅन ठेवा नंतर पुरण पोळी टाकून व्यवस्थित दोन्हीबाजूने भाजून घ्या.