Siddhi Hande
डोसा हा लहानापांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. परंतु तुम्ही कधी लोणी डोसा खाल्लाय का?
लोणी डोसा हा खूप सॉफ्ट आणि लुसलुशीत असतो. तो खायला खूप चविष्ट असतो.
लोणी डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी तांदूळ, उडीद डाळ, साबुदाणा आणि मेथी दाणे स्वच्छ धुवून घ्या.
हे सर्व मिश्रण एकत्र करा आणि रात्रभर किमान ५ ते ६ तास भिजत ठेवा.
यानंतर हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. यामध्ये थोडं-थोडं पाणी टाका.
यानंतर पीठ झाकून ठेवा. पीठ ८ ते ७ तास उबदार जागी ठेवा. जेणेकरुन पीठ छान आंबेल.
यानंतर दुसऱ्या दिवशी नॉन स्टिक तवा गरम करा.
हा तवा गरम झाल्यावर हे पीठ त्यावर गोलाकार पसरवून घ्या.
डोसा तयार करताना त्याच्या बाजून खूप लोणी (बटर) सोडा.
यानंतर डोसा छान भाजून घ्या. हा डोसा सोनेरी झाल्यावर तो काढून घ्या. त्यावर पुन्हा एकदा लोणी टाका.
हा लोणी डोसा तुम्ही नारळाची चटणी किंवा सांबरसोबत खाऊ शकतात.