Manasvi Choudhary & ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रात अनेक पारंपारिक पदार्थ बनवले जातात ज्याची रेसिपी आपल्याला माहित नाही. चिंच आणि गुळाची आमटी ही एक प्रसिद्ध रेसिपी आहे.
नियमितच्या डाळीच्या वरणाला आराम द्यायचा असेल तर तुम्ही ही चिंच, गुळाची आमटी ट्राय करू शकता.
चिंच, गुळाची आमटी बनवण्यासाठी तूर डाळ, हिंग, मोहरी, चिंच, गूळ, मीठ, मसाला, कोथिंबीर, कडिपत्ता, खोबऱ्याचा किस हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम चिंच, गुळाची आमटी बनवण्यासाठी एका भांड्यात तुरडाळ पाण्यामध्ये भिजत घाला. यानंतर गॅसवर कुकरमध्ये हिंग आणि हळद मिक्स करून तुरडाळ शिजवून घ्या.
गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये गरम तेलामध्ये हिंग, हळद, मसाला, कडिपत्ताची फोडणी द्या. यानंतर त्यात शिजलेली तुरडाळ मिक्स करा.
डाळ थोडी घट्ट झाल्यानंतर त्यात लाल मसाला, हिरवी मिरची, चिंचेचा कोळ आणि गूळ मीक्स करा. काही मिनिटांनी खोबऱ्याचा किस आणि चवीसाठी मीठ घाला.
अशाप्रकारे आबंट - गोड चिंच आणि गुळाची आमटी सर्व्हसाठी तयार आहे.