Siddhi Hande
पॅनकेक हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो.
पॅनकेक बनवण्यासाठी सर्वात आधी मैदा, बेकिंग पावडर, साखर, मीठ मिक्स करा.
यानंतर दुसऱ्या भांड्यात अंड छान फेटून घ्या.
त्यात दूध आणि बटर टाकून मस्त मिक्स करुन घ्या.
यानंतर मैद्यात हे अंड टाका आणि छान फेटून घ्या. त्याच्या गुठल्या होऊन देऊ नका.
यानंतर एका बाजूला तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर बटर लावा आणि पॅनकेकचे मिश्रण पसरवून घ्या.
एका बाजूने पॅनकेक छान सोनेरी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
यावर तुम्ही मध, चॉकलेट सिरप टाकून खाऊ शकतात.