Sakshi Sunil Jadhav
पावसाळा हा भजी शिवाय अपूर्णच असतो.
कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी तुम्ही खाल्लेच असतील आज आपण कुरकुरीत लसूणी भजीची रेसिपी पाहणार आहोत.
पिवळी बारीक शेव, पांढरे तीळ, धणे, काळीमिरी, लाल मिरची पावडर, साखर,आलं,लसूण पाकळ्या,तेल,कोथिंबीर, बेसन,तांदळाचं पीठ,हळद, ओवा इ.
सगळ्यात आधी बटाटे गोल आकारात कापून घ्या.
आता एका मिक्सरच्या भांड्यात शेव, पांढरे तीळ, धणे, काळीमिरी, लाल मिरची पावडर, साखर, आलं, लसणाच्या पाकळ्या,जिरे पूड, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ एकत्र करुन भरड तयार करा.
पुढे मिक्सरमध्ये बारिक कोथिंबीर आणि तेल एकत्र करून फिरवून घ्या.
आता बटाट्याला स्टफ करून घ्या. मसाले एकत्र करून घ्या.
एका मोठा बाऊलमध्ये बेसन, तांदुळाच पीठ हळद, ओवा, मीठ, बारीत कोथिंबीर गरजेनुसार पाणी ओतून पीठ तयार करा.
आता बटाटे बेसनात बुडवून छान तळून घ्या. सकाळच्या नाश्त्यासोबत गरमा गरम सर्व्ह करा.