Ukadiche Modak Dough: गणेशोत्सवासाठी परफेक्ट उकडीच्या मोदकाचे पीठ कसे मळावे? जाणून घ्या सविस्तर पद्धत

Dhanshri Shintre

पाणी गरम करणे

एका जाड बुडाच्या पातेल्यात २ कप पाणी गरम करायला ठेवा. पाण्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल किंवा तूप टाका.

पाणी उकळणे

पाणी व्यवस्थित उकळून आल्यावरच त्यात तांदळाचे पीठ टाकायचे. उकळलेले पाणी पीठ घट्ट बांधून ठेवते.

तांदळाचे पीठ घालणे

उकळत्या पाण्यात १ कप बारीक गाळलेले तांदळाचे पीठ एकदम टाका आणि लगेच गॅस मंद करा.

झाकून शिजवणे

पाणी-पीठ व्यवस्थित मिसळून झाकण ठेवून २-३ मिनिटे मंद गॅसवर वाफ येऊ द्या.

मिश्रण ढवळणे

झाकण काढून पीठ लाकडी चमच्याने हलवून एकत्र करा. गुठळ्या होऊ नयेत म्हणून चांगले ढवळणे महत्त्वाचे आहे.

मळायला सुरुवात करा

हाताला पाणी लावून कोमट उकड एका मोठ्या थाळीत काढा आणि मळायला सुरू करा.

तूप वापरणे

पीठ मऊ व लवचिक व्हावे यासाठी मळताना थोडे तूप किंवा तेल हाताला लावून मळावे.

गुठळ्या नाहीत याची खात्री करा

पीठ अगदी गुळगुळीत, मऊ आणि न गुठळ्यांचे झाले पाहिजे. हाताला चिकटत नसेल, तर पीठ योग्य तयार झाले आहे.

NEXT: उकडीचे मोदकाच्या कळ्या नीट येत नाही? पीठ बनवताना वापरा 'हे' ट्रिक्स मोदक तुटणार नाही

येथे क्लिक करा