Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला उपमा खायला अनेकांना आवडतो. चटपटीत, असा तिखट- गोड उपमा चविष्ट लागतो. उपमा घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सकाळी नाश्त्याला हलकं पचायला सोपे असं म्हणून तुम्ही रवा उपमा बनवू शकता. तुम्ही घरच्या घरी अगदी सहज बनवू शकता.
रवा उपमा बनवण्यासाठी रवा, तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, आलं, मटार, कोथिंबीर, मीठ, मसाला हे साहित्य घ्या.
रवा उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एका कढईमध्ये रवा चांगला खरपूस भाजून घ्या. रवा भाजल्यानंतर गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल गरम करा आणि त्यात मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि आलं पेस्ट परतून घ्या.
हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात मटार घाला आणि ते चांगले शिजवून द्या.मसाला तयार झाल्यानंतर त्यात तुम्ही भाजलेला रवा घाला आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करा. मिश्रणात थोडेसे पाणी घालून चांगले फेटून घ्या.
नंतर या संपूर्ण मिश्रणात हळद, मसाला आणि मीठ घालून झाकण ठेवा. अशाप्रकारे सर्व्हसाठी मस्त गरमा गरम रवा उपमा तयार होईल.