Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला मऊसूत शिरा खायला सर्वांनाच आवडतो. अत्यंत झटपट होणारी ही रेसिपी आहे. घरच्याघरी शिरा बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे.
शिरा बनवण्यासाठी तुम्हाला जाड रवा, तूप, साखर, जायफळ, ड्रायफ्रुट्स, दूध, केळे हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम गॅसवर कढईत रवा चांगला खरपूस भाजून घ्या. रवा भाजताना तो करपणार नाही याची काळजी घ्या.
रवा भाजून झाल्यांनतर एका प्लेटमध्ये काढा त्याच कढईत काजू, बदाम ड्रायफ्रुट्स भाजून घ्या.
पुन्हा कढईत तूप घालून त्यात रवा मिक्स करा नंतर त्यात थोडेसे पाणी मिक्स करा आणि मिश्रण एकजीव करा.
या मिश्रणात साखर मिक्स करा नंतर दूध आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करून मिश्रण चांगले घट्ट शिजवून घ्या. साधारणपणे ५ ते १० मिनिटे शिरा शिजल्यानंतर त्यात ड्रायफ्रुट्सचे काप मिक्स करा.