Saam Tv
तांदुळ, उडीद डाळ, पोहे, मेथी दाणे, तेल, मीठ इ.
३ कप तांदुळ, १ कप उडीद डाळ आणि १ चमचा मेथी दाणे स्वच्छ धुवून ६ ते ८ तास वेगवेगळे भिजत घाला.
आता पोहे धुवून ओलसर असताना त्यात मेथी दाणे, तांदुळ नंतर उडीद डाळ मिक्सर मधून वाटून घ्या.
हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा. आणि सकाळी आंबोळ्या करायला सुरुवात करा.
फुललेल्या पीठात आवश्यक असल्यास पाणी ओतून तुम्ही गरम तव्यावर आंबोळ्या करा. त्यासाठी गरम तव्यावर एक पळी पीठ घालून गोलआकारात पसरवा.
मग त्यावर झाकण ठेवून स्लो गॅसवर १ ते २ मिनिटे शिजवा.
२ मिनिटानंतर परतून दुसऱ्या बाजूने शेकवा आणि गरमा गरम सर्व्ह करा.
तुम्ही या आंबोळ्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.