Manasvi Choudhary
आज सर्वत्र गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
गुढीपाडव्यानिमित्त गोड पदार्थाचे नैवेद्य बनवले जातात.
आज आम्ही तुम्हाला घरीच श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
गुढीपाडवा बनवण्यासाठी दही, पिठी साखर, वेलची पावडर, जायफळ पावडर, ड्रायफ्रुट्स, कोमट दूध, केशर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम दही एका कपड्यामध्ये रात्रभर बांधून चक्का तयार करून घ्या. केशर दुधामध्ये भिजत घाला.
नंतर या दह्याच्या तयार चक्क्यामध्ये पिठीसाखर घाला.
संपूर्ण मिश्रणात केशर दूध, जायफळ पावडर घालून चक्का फेटून घ्या.
नंतर या मिश्रणात ड्रायफ्रुट्स घाला आणि फ्रिजमध्ये ठेवा. अशाप्रकारे गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड तयार आहे.