Sakshi Sunil Jadhav
शिरवळे ही खास कोकणातली पांरपारिक आणि पावसाळ्यात खाल्ली जाणारी रेसिपी आहे.
तांदूळ, मीठ,पाणी, तेल,नारळाचे दूध, साखर, गुळ इ.
तांदूळ ६-८ तास भिजवून ठेवावेत. भिजवलेले तांदूळ थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर गाळून त्याचं सैलसर पिठ तयार करा.
पातेल्यात थोडंसं पाणी गरम करून त्यात हे पिठ आणि मीठ घालून सतत हलवत शिजवा. हे पिठ घट्ट व्हायला पाहिजे.
शिरवळ्याचा साचा (जाळीदार झाऱ्यासारखा) वापरून त्यात गरम पिठ घालून शिरवळे वाफवून घ्या. हे इडली स्टँडमध्ये किंवा कुकरमध्ये १०-१२ मिनिटं वाफवावं.
ओल्या नारळाचा किस, पाणी आणि गूळ / साखर एकत्र करून मिक्सरमध्ये वाटा आणि गाळून गोड नारळाचं दूध तयार करा.
शिरवळे गरम गरम नारळाच्या दुधासोबत साखर किंवा गुळ घालून सर्व्ह करा.