Saam Tv
रोजच्या पोळीचा सर्वांनाच कंटाळा येतो? पण बाहेरचे पदार्थ शरीरासाठी फार चांगले नसतात.
तुम्ही अशा वेळेस घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल चटपटीत शेजवान बटाटा फ्रॅंकी सोप्या स्टेप्सने तयार करू शकता.
एका पॅनमध्ये तेल आल-लसूण पेस्ट, कांदा आणि हिरवी मिरची छान परतून घ्या.
त्यामध्ये शेजवान चटणी, लाल तिखट, उकडलेला बटाटा व्यवस्थित परतून घ्या.
संपुर्ण भाजीवर कांद्याची पात किंवा कोथिंबीर मिक्स करा. तयार आहे तुमची भाजी.
आता एक चपाती घ्या. चपातीला शेजवान सॉस, मेयोनिज, टोमॅटो पुर्ण लावून घ्या.
त्यामध्ये तयार भाजी आणि उभा चिरलेला कांदा वरून घाला. त्याला आता फ्रॅंकी सारखा रोल करून घ्या.
आता एक पॅन गरम करा. त्यावर बटर पसरवून मसाला आणि कोथिंबीर पसरवा.
पुढे फ्रॅंकी त्यावर क्रिस्पी होईपर्यंत शेकवा. तयार आहे तुमची चटपटीत शेजवान फ्रॅंकी रेसिपी.