Manasvi Choudhary
वडा पाव, सॅन्डविच सर्व्ह करताना लाल आणि हिरवी चटणी दिली जाते.
हिरवी चटणी पदार्थाची चव आणखी वाढवते.
हिरवी चटणी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
हिरवी चटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, मीठ, लसूण, काळे मीठ, चाट मसाला हे साहित्य घ्या
सर्वप्रथम मिरच्या धुवून बारीक कापून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, दही, मीठ आणि लसूण यांचे मिश्रण करून घ्या.
वाटलेल्या चटणी मध्ये काळमीठ आणि चाट मसाला घाला संपूर्ण मिश्रण छान घट्ट करा.
अशाप्रकारे सर्व्हसाठी सॅन्डविच हिरवी चटणी तयार आहे.