Siddhi Hande
साबुदाणा खिचडी प्रत्येक मराठी घरात हमखास बनवली जाते.
साबुदाणा खिचडी खायला चविष्ट असते. प्रत्येक घरात साबुदाणा खिचडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात.
तुम्ही जर खिचडीत बटाटा किसून टाकला तर त्याची चव अजूनच चांगली जाते.
सर्वात आधी तुम्ही साबुदाणे ४-५ तास भिजत घाला.
यानंतर एका कढईत तेल टाका. त्यात वाटलेली मिरची टाका.
त्यानंतर एका बाजूला बटाटा बारीक किसून घ्या. हा किस तुम्ही कढईत टाका.
त्यानंतर वरुन साबुदाणे टाका. सर्व मिक्स करुन घ्या.
त्यानंतर त्यावर शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त मिक्स करा.
यानंतर वरुन चवीनुसार मीठ टाकून. काही मिनिटे वाफेवर शिजवून घ्या.