Sabudana-Batata Chakli: घरच्या घरी उपवासाची साबुदाणा-बटाटा चकली कशी बनवायची? वाळवणाची रेसिपी वाचा

Siddhi Hande

वाळवणाचे पदार्थ

उन्हाळा सुरु झाला आहे. त्यानंतर आता वाळवणाचे पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली आहे.

Sabudana-Batata Chakli

साबुदाणा-बटाटा चकली

तुम्ही घरीच साबुदाणा-बटाटा चकली बनवू शकतात. ही चकली तुम्ही उपवासादेखील खाऊ शकतात.

Sabudana-Batata Chakli

साहित्य

साबुदाणा, बटाटे, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, पाणी

Sabudana-Batata Chakli

साबुदाणा भिजत ठेवा

साबुदाणा रात्रभर भिजत ठेवा किंवा शिजवून घ्या.

Sabudana-Batata Chakli

बटाटे उकडून घ्या

यानंतर बटाटे उकडून घ्या. त्याची साल काढा. हे बटाटे बारीक किसून घ्या.

Sabudana-Batata Chakli

साबुदाणा आणि बटाटा

यानंतर शिजवलेला साबुदाणा आणि किसलेला बटाटा एकत्र करा. त्यात मीठ,हिरवी मिरची पेस्ट टाका.

Sabudana-Batata Chakli

पीठ घट्ट मळा

हे पीठ एकदम घट्ट मळून घ्या.

Sabudana-Batata Chakli

चकल्या पाडून घ्या

यानंतर चकलीच्या साच्याला तेल लावून ग्या. त्यात हे मिश्रण भरुन प्लास्टिकच्या कागदावर चकल्या पाडा.

Sabudana-Batata Chakli

वाळवून घ्या

या चकल्या दोन ते तीन दिवस कडक वाळवून घ्या.

Sabudana-Batata Chakli

चकल्या तळून घ्या

या चकल्या तुम्ही तेल गरम करुन तळू शकतात.

Sabudana-Batata Chakli

Next: गुळाचा छोटासा तुकडा तुमचा चेहरा करेल चमकदार, कसा करायचा वापर?

Summer Skin Care | saam tv
येथे क्लिक करा