Manasvi Choudhary
उन्हाळ्यात थंडगार रोज फालूदा खायला सर्वांनाच आवडतो. मात्र घरीच रोज फालूदा बनवता अनेकांना येत नाही यासाठी आम्ही सोपी रेसिपी सांगणार आहोत.
रोज फालूदा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
रोज फालूदा बनवण्यासाठी दूध, रोज सिरप, शेवया, सब्जा, व्हॅनिला आइस्क्रिन, ड्रायफ्रुट्स हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी एका ग्लासमध्ये पाण्यात सब्जा १० मिनिटे भिजत घाला म्हणजे सब्जा चांगला फुलेल.
गॅसवर एका भांड्यात फालूदा शेव उकळून घ्या. शेव उकळल्यानंतर थंड पाण्याने धुवून बाजूला ठेवा.
त्यानंतर एका ग्लासमध्ये एक ते दोन चमचे गुलाबाचे सिरप मिक्स करा.
यानंतर त्यात उकडलेली फालूदा शेव आणि सब्जा एकत्र मिक्स करा. नंतर या मिश्रणात थंड दूध घालून मिश्रण एकजीव करा.
तयार रोज फालूद्यात वरतून व्हॅनिला आइस्क्रिम ठेवा. गुलाबाचे सिरप वरतून ओता आणि बारीक केलेले ड्रायफ्रुट्स देखील घाला. अशाप्रकारे घरच्या घरी रोज फालूदा तयार होईल.