ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुलाबाच्या पाकळ्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असून, त्वचेला चमकदार बनवतात. त्यांचा वापर फेस क्रीम बनवण्यासाठीही केला जातो.
घरी क्रिम बनविण्याकरिता फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या, एलोवेरा जेल, नारळ तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल इ. साहित्य लागते.
सर्वप्रथम, गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवा आणि त्यांची बारीक पेस्ट बनवण्यासाठी त्या वाटून घ्या.
आता तयार केलेल्या पेस्टमध्ये एलोवेरा जेल आणि नारळ तेल टाकून चांगले फेटून घ्या.
एकदा त्याला क्रिमी टेक्सचर आल्यावर, त्यात व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल मिसळा आणि नंतर ते स्टोर करुन ठेवा.
या क्रिमला चेहऱ्यावर आठवड्यातून २ ते ३ वेळा लावून हलक्या हाताने मसाज सुध्दा करा.
ही क्रिम फक्त त्वचा गुलाबी करण्यासाठी नाही तर, त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि चमकदार बनवण्यासाठी सुध्दा फायदेशीर आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.