Manasvi Choudhary
आजकाल बदलेल्या जीवनशैलीमुळे तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे त्वचेवर परिणाम होत आहे.
त्वचेवर सुरकुत्या येणे, पिंपल्स येणे, काळे डाग येणे यामुळे त्वचा कमी वयात खराब होत आहे.
यासाठी तुम्ही घरगुती तांदळापासून बनवलेली क्रिम चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते.
तांदळाची क्रिम बनवण्यासाठी तांदूळ, जवस, गुलाबणी, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, कोरफड जेल हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी एका भांड्यात पाणी उकळून घ्या नंतर त्यात तांदूळ आणि जवस हे घाला.
हे मिश्रण उकळल्यानंतर तांदूळ आणि जवसमधील पाणी गाळून त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफडीचा गर मिक्स करा.
या मिश्रणात गुलाबजल मिक्स करा गुलाबजल त्वचेला ताजेतवाने करते आणि त्वचेवरील लालसरपणा कमी करते.