Siddhi Hande
पनीर खायला अनेकांना आवडते. परंतु नेहमीची पनीरची भाजी किंवा पनीर चिली खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
तुम्ही घरीच पनीर क्रिस्पी बनवू शकता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.
पनीर, कॉर्नफ्लोअर, मैदा, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, काश्मिरी मिरची पावडर, गरम मसाला, तेल
सर्वात आधी तुम्हाला एका एका भांड्यात कॉर्नफ्लोअर मैदा, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ टाकायचे आहे.
या मिश्रणात थोडं पाणी टाकून नीट मिक्स करुन घ्या. ही पेस्ट जास्त पातळ नसावी.
यानंतर पनीरचे तुकडे या पेस्टमध्ये टूकन छान मिक्स करुन घ्या.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात हे मॅरिनेट केलेले तुकडे छान तळून घ्या.
यानंतर तुम्ही पनीर चिलीसाठी जी ग्रेव्ही बनवता ती बनवा. त्यात हे तुकडे टाकून छान फ्राय करुन घ्या.
तुम्ही हे तळलेले तुकडे देखील खाऊ शकतात. हे तुकडे जास्त वेळ ग्रेव्हीत ठेवल्यास ते मऊ होतील.