Matar Paneer: घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मटार पनीर; रेसिपी लगेच करा नोट

Siddhi Hande

पनीरची भाजी

नेहमीच्या पालेभाज्या खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही पनीरची भाजी बनवू शकते.

Matar Paneer

मटार पनीर भाजी

पनीरमध्येही तुम्ही जर मटार पनीरची भाजी बनवली तर सर्वजण आवडीने खातील.

Matar Paneer

साहित्य

पनीर, मटार, कांदे, टॉमेटो, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, जिरे, हळद पावडर, लाल तिखट, धने-जिरे पूड, गरम मसाला, तेल किंवा बटर, मीठ, कोथिंबीर

Matar Paneer

पनीरचे तुकडे

सर्वात आधी तुम्हाला पनीरचे चौकोनी तुकडे करायचे आहे. तूम्ही हे पनीर तुकडे थोडे फ्रायदेखील करु शकतात.

Matar Paneer

तेल

यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात जिरे टाका. बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची टाकून परतून घ्या.

Matar Paneer

टॉमेटो प्युरी

यानंतर टॉमेटोची प्युरी टाका. तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या.

Matar Paneer

लाल तिखट

यानंतर हळद, लाल तिखट, धने जिरे पूड आणि मीठ टाकून परतून घ्या.

Matar Paneer

मसाले

यानंतर मसाले शिजल्यावर हिरवे वाटाणे म्हणजेच मटार आणि गरम पाणी टाका. मटार शिजेपर्यंत वाफ काढा.

Matar Paneer

मटार पनीर सर्व्ह करा

यानंतर पनीरचे तुकडे गरम मसाला टाकून मिक्स करा. २-३ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. भाजीवर कोथिंबीर टाकून मटार पनीर सर्व्ह करा.

Next: मऊसूत ज्वारीची इडली कशी बनवायची? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

idli
येथे क्लिक करा