Sakshi Sunil Jadhav
थालीपीठ खायची इच्छा झाली असेल आणि भाजणीचे पीठ तयार नसेल तर ही रेसिपी वाचा.
तुम्ही फक्त १० मिनिटांत तुम्ही हा पौष्टीक आणि झटपट नाश्ता तयार करू शकता.
बारीक रवा, कांदा, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, साखर, कोथिंबीर, मीठ, पाणी, तेल.
बारीक रवा एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.
भांड्यामध्ये बारीक कांदा, किसलेलं खोबरं,हिरव्या मिरच्या, साखर, कोथिंबीर,मीठ आणि पाणी घालून मिक्स करा.
मिश्रणामध्ये कमी पाणी घाला. पीठ थालीपीठ करता येईल असे असावे.
आता पॅन गरम करून तेल पसरवून घ्या.
आता पॅनवर मिश्रणाचा एक गोळा टाकून छापून घ्या आणि मध्ये छिद्र करा.
थालीपीठ दोन्ही बाजुंनी शेकवून गरमा गरम सर्व्ह करा.