Rava Modak Recipe: आज संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पासाठी बनवा रव्याचे मोदक, जाणून घ्या रेसिपी

Manasvi Choudhary

संकष्टी चतुर्थी

आज ५ एप्रिल २०२६ संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस गणपती बाप्पााला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते. या दिवशी बाप्पा गणेशाची भक्तिभावाने पूजा केली जाते.

Rava Modak Recipe | Meta AI

रव्याचे मोदकाचे नैवेद्य

गणपती बाप्पाला मोदक प्रिय असल्याने आज आपण बाप्पाासाठी रव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखवूया.

How To Make Rava Modak

सोपी रेसिपी

रव्याचे मोदक घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे. कसे बनवायचे हे जाणून घेऊया.

Easy Rava Modak Recipe | yandex

गुळ आणि खोबरे मिक्स करा

रव्याचे मोदक बनवण्यासाठी सर्वातआधी गॅसवर एका भांड्यात गुळाची पावडर आणि बारीक किसलेले खोबरे मिश्रण घाला. हे मिश्रण योग्य परतून घ्या. मिश्रण करपणार नाही याची काळजी घ्या.

Jaggery | yandex

वेलची पावडर मिक्स करा

मिश्रणात गूळ वितळले की मिश्रण चांगले घट्ट शिजवून घ्या. मिश्रण शिजल्यानंतर गॅस बंद करा. म्हणजेच सारण तयार होईल. या तयार सारणमध्ये वेलची पावडर मिक्स करा म्हणजे सारण चांगले चवदार होईल.

Velchi Powder | GOOGLE

पाणी उकळवा

नंतर सारण थंड होण्यासाठी झाकण ठेवून ४ ते ५ मिनिटे बाजूला ठेवा. गॅसवर दुसऱ्या एका भांड्यात अर्धा कप पाणी उकळून घ्या नंतर त्यात तेल, तूप आणि मीठ मिक्स करा. हे संपूर्ण मिश्रण मध्यम आचेवर उकळल्यानंतर बाजूला ठेवा. नंतर यात बारीक रवा मिक्स करा.

Hot water | GOOGLE

रवा मिक्स करा

चमच्याच्याने संपूर्ण मिश्रण एकजीव करा म्हणजे रवा पाण्यात मिक्स होईल. पुन्हा गॅसवर मिश्रण ठेवा आणि एकजीव करा. रव्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. जर मिश्रण तुम्हाला कोरडे वाटत असेल तर यात थोडे गरम पाणी मिक्स करा.

Rava | yandex

मोदकाचे पीठ तयार करा

रवा चांगला शिजल्यानंतर पीठाप्रमाणे ते मळून घ्या. मळताना हाताला थोडे तेल लावा. त्यानंतर मोदक बनवण्यासाठी छोटा पिठाचा गोळा घ्या. तो तळहाताने चपटा करा.

Rava Modak Recipe

रव्याचे मोदक तयार

दोन्ही बोटांनी कडा दाबून त्यामध्ये सारण भरा. सर्व कडा बंद करून मोदकाचा आकार द्या. अशाप्रकारे घरच्या घरी स्पेशल रव्याचे मोदक तयार होतील. नंतर ते गणपती बाप्पााला अर्पण करा.

Rava Modak Recipe

NEXT: Sun Tan Removal Tips: उन्हामुळे हात-पाय काळवंडलेत? काळजी करू नका! स्वयंपाकघरातील सोपे 5 उपाय घालवतील टॅनिंग

येथे क्लिक करा...