Manasvi Choudhary
रवा कटलेट सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे.
रवा कटलेट घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सहजपणे रवा कटलेट रेसिपी ट्राय करू शकता.
रवा कटलेट बनवण्यासाठी रवा, बटाटा, कांदा, कोथिंबीर, गाजर, मटार, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, हळद, लाल मसाला, मीठ, तेल हे साहित्य एकत्र करा.
रवा कटलेट बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये गरम पाणी त्यात थोडे मीठ आणि तेल टाका. पाण्याला उकळी आली की या मिश्रणात रवा मिक्स करा.
एका प्लेटमध्ये शिजलेला रवा काढून त्यात उकडलेले बटाटे मिक्स करा. भाज्या बारीक चिरून त्यात मिक्स करा. नंतर या संपूर्ण मिश्रणात मसाला, आले- लसूण पेस्ट, मीठ हे मसाले मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण चांगले पिठासारखे मळून घ्या. या तयार मिश्रणाचे हार्टशेपमध्ये गोल वडे करून घ्या.
नंतर हे कटलेट गॅसवर पॅनमध्ये गरम तेलात शॅलो फ्राय करा. अशाप्रकारे घरीच कुरकुरीत रवा कटलेट तयार होतील.