Manasvi Choudhary
सकाळचा नाश्ता हा हेल्दी अन् टेस्टी असावा.
नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी आज नाचणीचा डोसा करा.
नाचणीचा डोसा चवीला टेस्टी आणि पौष्टिक आहे
नाचणीचा डोसा बनवण्यासाठी नाचणी, रवा, तांदळाचे पीठ, दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, जिरे, मीठ, तेल, आलं हे साहित्य घ्या.
नाचणीचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात नाचणी पीठ, रवा आणि तांदळाचे पीठ मिक्स करा.
नंतर मिश्रणात दही, आलं, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, जिरे, चवीनुसार मीठ घाला.
मिश्रणात थोडे पाणी घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये तयार नाचणी पीठ पसरवा
दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यत चांगले परतून घ्या.
अशाप्रकारे सर्व्हसाठी नाचणी डोसा तयार आहे.