Manasvi Choudhary
पुदीना आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
पुदीनाच्या पानांची चटपटीत चटणी खायला सर्वांनाच आवडते.
पुदीनाची चटणी घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
पुदीनाची चटणी बनवण्यासाठी पुदीना, कोथिंबीर, लिंबाचा रस, जिरे, लसूण पाकळ्या, साखर, चवीनुसार मीठ, पाणी साहित्य घ्या.
सर्वप्रथम पुदिना,कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्या.
पुदिना, कोथिंबीर,मिरची, लसुण, जिरे, साखर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्सर ला छान चटणी वाटून घ्या.
तयार हिरवीगार पुदिना चटणी पराठा, सँडविच, बटाटे वडे, इडली सोबत सर्व्ह करू शकता.