Manasvi Choudhary
आज १० फेब्रुवारी सोमवार आहे. हिंदू धर्मात पूजेत देवाला नैवेद्य दाखवला जातो.
गणपती नैवेद्य, सत्यनारायण पूजा असल्यास गोड पदार्थ म्हणजे प्रसादाचा शिरा बनवला जातो.
प्रसादाचा शिरा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी साजूक तूप, केळी, रवा, काजू- बदाम, मनुके, दूध, साखर, तुळशीची पाने, वेलची हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात साजूक तुपामध्ये पिकलेली केळी घालून उत्तमप्रकारे शिजवून घ्या.
नंतर हे संपूर्ण मिश्रण एका भांड्यात काढून थंड करा.
गॅसवर दुसऱ्या भांड्यात साजूक तुपामध्ये रवा घालून तो खरपूस भाजून घ्या.
नंतर यामध्ये काजू आणि बदामाचे बारीक काप घालावेत
यानंतर हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून बदामी रंग आल्यानंतर यामध्ये मनुके घाला
मिश्रण गरम दूध घालून चांगले परतून घ्या नंतर यामध्ये साखर, वेलची पूड तुपात परतून घेतलेली केळी घाला. सर्व मिश्रण एकत्रित करून शिऱ्यावर ५ ते ७ मिनिटे झाकण लावा.
अशाप्रकारे सर्व्हसाठी गोड प्रसादाचा शिरा तयार आहे.