Dhanshri Shintre
नीर डोसा ही मंगळुरुची खासियत असून कर्नाटकातील बहुतांश रेस्टॉरंट्समध्ये हा हलका आणि चविष्ट नाश्ता मिळतो.
कोकणातील प्रसिद्ध नीर डोसा हा भारतात लोकप्रिय असून तो सकाळपासून रात्रीपर्यंत कोणत्याही वेळी खाऊ शकतो.
एका मोठ्या भांड्यात १ कप तांदूळ स्वच्छ धुवा, नंतर ४ ते ८ तास पाण्यात भिजवा.
पाणी काढून टाका, तांदूळ ब्लेंडरमध्ये घाला. सुमारे ३/४ कप पाणी हळूहळू घालून मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत वाटा.
भांड्यात मिश्रण काढून मीठ घाला आणि आवश्यक असल्यास अधिक पाणी घालून ते पातळ करा.
पॅन तापवा, काही थेंब तेल घाला आणि कांद्याच्या तुकड्याने पॅनमध्ये सर्वत्र तेल लावा.
पीठ घेऊन पॅनच्या कडेपासून ओतत जाऊन तवा पूर्ण झाकेल अशा पद्धतीने पसरवायला सुरुवात करा.
पॅन झाकून २ मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर शिजवा. नीर डोसा उलटवत नाही, मऊपणे शिजवला जातो.
नीर डोसा गरमागरम चटणी किंवा आवडत्या रसदार भाजीसोबत सर्व्ह करा आणि चविष्ट नाश्ता तयार करा.