Manasvi Choudhary
हिवाळ्यात गरमागरम चहा प्यायला सर्वानाच आवडते. अनेकदा घरी टपरीसारखा स्पेशल चहा होत नाही.
चहा बनवताना काही सोप्या टिप्स तुम्ही वापरून केल्या तर चहा चवीष्ट होतो.
चहाचा मसाला नेहमी चहाला पहिली उकळी आल्यानंतर टाकावा. यामुळे मसाल्याचा सुगंध आणि चव टिकून राहते.
आले कधीही किसून टाकण्यापेक्षा ठेचून टाकावे, यामुळे चहाचा कडवटपणा कमी होतो आणि स्वाद वाढतो.
हॉटेलसारखा स्पेशल चहा हवा असल्यास तुम्ही चहामध्ये पाण्याचे प्रमाण कमी आणि दूध जास्त टाकावे.
चहामध्ये गूळ टाकताना चहा गॅसवरून उतरवल्यावर टाकावा, जेणेकरून चहा फाटणार नाही.
दूध टाकल्यानंतर चहा फक्त उकळू देऊ नका, तर पळीने किंवा चमच्याने ५-६ वेळा वर-खाली करा. यामुळे चहामध्ये हवा खेळती राहते
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.