कोमल दामुद्रे
सकाळच्या नाश्त्यात रोज नवीन काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो.
सकाळी काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खाण्यावर अनेकांचा भर असतो.
रोज तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर सोयाबिनची इडली ट्राय करु शकता.
२ वाटी तांदूळ, १ वाटी उडदाची वाटी, सोयाबीन १ वाटी, १ चमचा मेथी दाणे, चवीनुसार मीठ
सर्वप्रथम तांदूळ आणि सोयाबिन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ५-६ तास भिजत ठेवा.
उडीद डाळ आणि मेथी दाणे ५-६ तासांसाठी एका वाटीत भिजत घाला.
त्यानंतर भिजत घातलेले उडीद डाळ, तांदूळ आणि सोयाबीन मिक्सरला चांगले वाटून घ्या.
इडली बॅटर तयार झाल्यानंतर चांगले मिसळून घ्या. मोठ्या भांड्यात घेऊन रात्रभर बॅटर तसेच ठेवा.
सकाळी उठल्यानंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्या. इडलीच्या साच्यात पीठ घालून तयार इडली करा.
चटणीसोबत सर्व्ह करा हेल्दी व टेस्टी सोयाबीनची इडली.