Manasvi Choudhary
वडापाव आणि समोसा पाव खायला लहानांपासून अगदी मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते.
हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रत्येकजण आवडीने समोसा खातो.
अशातच आज आम्ही तुम्हाला समोसा घरी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.
समोसा घरी बनवताना मैदा, मीठ, ओवा, तेल, बटाटे, हिरवा वटाणा, आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम समोसा भाजी तयार करताना आलं लसूण पेस्ट आणि मिरची परतून घ्या.
मिश्रणात नंतर वाटाणे घालून परतून यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करा. नंतर मिश्रणामध्ये मीठ घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
समोसाचे कवर बनवण्यासाठी मैदा, मीठ,ओवा आणि तेल मिक्स करून घ्या नंतर यामध्ये पाणी घालून कणिक मळून घ्या.
नंतर कणकेचे छोटे गोळे तयार करून पुरी सारखे लाटून घ्या कडेला पाणी लावून त्रिकोणी आकार द्या.
त्रिकोणी आकारात भाजी भरून व्यवस्थित दुमडून घ्या गॅसवर कढईत गरम तेलामध्ये तयार समोसे सोनेरी रंग होईपर्यत तळून घ्या.