Manasvi Choudhary
भाकरी थापून करण्याची जुनी पद्धत आहे. मात्रकाल आजकाल अनेक महिलांना भाकरी थापण्याची पद्धत जमत नाही.
भाकरी थापताना ती तुटते यासाठी आज आम्ही तुम्हाला भाकरी बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
भाकरी बनवण्यासाठी बाजरीचं पीठ, कोमट पाणी, पांढरे तीळ आणि कोरडे पीठ हे साहित्य घ्या.
एका परातीत बाजरीचं पीठ घ्या. त्यात थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ मळा. पीठ चपातीपेक्षा थोडं जास्त मळायचं.
पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा तयार करा. तो हातावर थोडा गोल करून चपटा करा.
पोळपाटावर थोडं सुकं पीठ घ्या नंतर त्यात गोळा ठेवून लाटण्याने अगदी हलक्या हाताने लाटा. लाटताना भाकरीला पीठ लावा जेणेकरून ती चिकटणार नाही.
भाकरी लाटून झाली की त्यावर थोडे तीळ टाका आणि लाटण्याने एकदा हलकेच फिरवा म्हणजे तीळ चिकटतील.
गॅसवर तव्यावर भाकरी टाका आणि हाताने थोडं पाणी लावून भाजून घ्या. भाकरीचं पाणी सुकलं की भाकरी पलटी करा. दोन्ही बाजू चांगल्या भाजून घ्या.