Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला समोसा, वडापाव हे चटपटीत पदार्थ खायला लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात.
मात्र समोसा तेलामध्ये तळत असल्याने अनेकजण तेलकट पदार्थ म्हणून खाणे टाळतात. मात्र घरच्या घरी तुम्ही कमी तेलामध्ये समोसा बनवू शकता.
समोसा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.
समोसा बनवण्यासाठी गहू, ओवा, मोहरी, बटाटा, काळी मिरी, जिरा पावडर, धना पावडर, कश्मिरी मिरची, मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी एका भांड्यात मैदा पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि ओवा हातावर चोळून मिक्स करा. समोशामध्ये ओवा टाकल्याने चव आणि पचन दोन्ही सुधारते.
नंतर या मिश्रणात मोहरीचे तेल मिक्स करा थोडेसे पाणी मिक्स करून पीठ मळून घ्या.
समोसा सारण बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर कुकरमध्ये बटाटे उकडून स्मॅश करून घ्या.
गॅसवर एका पॅनमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, मसाला, जिरा पावडर, मीठ घालून मिश्रणाला फोडणी द्या.
समोसा बनवण्यासाठी तयार पिठाचा गोळा करा. पिठाचा गोळा घेऊन गोलाकार चपातीसारखे लाटा. त्यानंतर मधून कापून दोन भाग करा.
एका भागाचा त्रिकोणी आकार तयार करा. कडांना पाणी लावून त्यात बटाट्याचे सारण भरा आणि खालची बाजू नीट बंद करा. म्हणजे समोसा आकार तयार होईल.
तयार केलेले समोसे तुम्ही एअर फ्रायरमध्ये ठेवा आणि बेक करा यामुळे समोसा तेलकट होणार नाही.
बेक होताना समोसा सर्व बाजूंनी पलटी करा म्हणजे कुरकुरीत होईल. कढईत तळण्यापेक्षा एअर फ्रायरमध्ये समोसा तळल्याने तेल कमी लागते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.