ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गेल्या काही वर्षांमध्ये UPI यूपीआय पेमेंट्समध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे पेमेंट करण्याच्या पद्धती बदल्या आहेत. NPCI ने २०१६ मध्ये या सर्व्हिसला लॉंच केले होते.
कोणालाही पैसे ट्रान्सफर करणे, किंवा ऑनलाईम पेमेंट करणे सोपे झाले आहे. परंतु, आता तुम्ही इंटरनेटशिवाय देखील यूपीआय पेमेंट्स करु शकता.
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे अकाउंट सेट अप करावे लागेल. *99# डायल करा. नंबर डायल केल्यानंतर भाषा निवडा.
यानंतर तुमचा IFSC कोड प्रविष्ट करा आणि तुमचा रजिस्टर नंबर असलेला अकाउंट निवडा.
यानंतर डेबिट कार्डचे शेवटचे ६ अंक आणि एक्सपायरी डेट प्रविष्ट करा. यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण होईल.
जो UPI अकाउंट रजिस्टर आहे त्याचा UPI पिन प्रविष्ट करा. यानंतर, तुम्ही *99# डायल करुन ऑफलाईन यूपीआय पेमेंट करु शकता.
यानंतर, सेंड मनी पर्यायवर क्लिक करा. ज्या युजरला पैसे पाठवायचे आहे त्या यूजरची माहिती भरा. पैसै म्हणजेच अमाउंट भरा आणि यूपीआय पिनने ऑफलाईन UPI पेमेंट पूर्ण करा.