ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांची सकाळची सुरुवात चहाने होते. तर काहींना जेवणानंतरही चहा लागतो.
जर तुम्हीही दरवेळी जेवणानंतर चहा पिणाऱ्यांपैकी असाल तर याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
जेवणानंतर चहा प्यायल्याने पचनक्रिया बिघडते. चहामुळे शरीरात पाचक रस तयार होण्यास अडचण येते, ज्यामुळे तुम्हाला अन्न पचवण्यास त्रास होतो.
चहामध्ये कॅफिन देखील असते, ज्यामुळे रक्तदाब वाढण्याची समस्या वाढू शकते. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी चहापासून दूर राहावे.
जेवणानंतर चहा प्यायल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत. यामुळे शरीरात आयरनची कमतरता निर्माण होऊ शकते.
जर तुम्ही दिवसभर सतत चहा पीत असाल तर तुम्हाला झोपेशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
जेवणानंतर चहा प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटी होऊ शकते. तसेच डोकेदुखीचा त्रास देखील होऊ शकतो.