Manasvi Choudhary
तांदळाचा फेस मास्क हा चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ग्लोईंग स्किनसाठी महिला व मुली तांदळाच्या पाण्याचा फेस मास्क लावतात.
तांदळाच्या पीठाचा फेस मास्क तुम्ही घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने बनवू शकता.
२ चमचे तांदळाचे पीठ, १ चमचा मध आणि २ चमचे कच्चे दूध मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास डाग कमी होतात व त्वचा मऊ होते.
अर्धी वाटी तांदूळ धुवून त्यात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. रोज रात्री चेहरा धुतल्यानंतर हे पाणी चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचा टाईट आणि चमकदार होते.
१ चमचा तांदळाचे पीठ आणि २ चमचे ताजे कोरफड जेल मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास जळजळ कमी होते.
तांदळाचा मास्क धुत असताना हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाईल आणि चेहरा लगेच फ्रेश दिसेल.