ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कुंकू घरातील प्रत्येक पुजेसाठी वापरले जाते. तसेच प्रत्येक स्त्रीसाठी कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं असतं.
बाजारात विविध लाल रंगाचे कुंकू सहज विकत मिळतात. मात्र यात जास्त प्रमाणात केमीकल असते.
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केमीकल विरहीत कुंकू घरीच कसं बनवायचं याची माहिती सांगणार आहोत.
कुंकू बनवण्यासाठी हळद महत्वाची असते.
पाच चमचे हळद घेतल्यास त्यात २ ते ३ थेब लिंबाचा रस मिक्स करा.
कुंकू बनवताना तुम्हाला यात काही प्रमाणात साधा चुना सुद्धा मिक्स करावा लागेल.
सर्व मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये एकजीव करून घेतल्यास कुंकू तयार होईल.
Madhuri Dixit : धकधक गर्लचं निस्सीम सौंदर्य