Manasvi Choudhary
वडापाव हा मुंबईचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वडापाव खायला आवडतो.
वडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
घरीच बटाटा वडा बनवण्यासाठी बटाटे, मिरच्या, आलं, कडीपत्ता, हळद, मोहरी, हिंग, कोथिंबीर, तेल, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, सोडा, तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम बटाटे शिजवून त्याची सालं काढून ते कुस्करून ठेवावे.
नंतर यामध्ये मग आले लसूण पेस्ट, बारीक मिरची आणि कोथिंबीर चिरून घालावी
गॅसवर एका छोट्या कढईमध्ये गरम तेलामध्ये हिंग,मोहरी व थोडीशी हळद व कढीपत्ता हाताने मोडून घालावा.
खमंग फोडणी वरील बटाट्याच्या मिश्रणात घालावी त्याचे गोळे तयार करा.
बेसनामध्ये तांदळाचे पीठ,मीठ,सोडा थोडी हळद व तिखट घालून पाणी घालून छान एकजीव करा.
नंतर बटाटावडे बेसनाच्या पीठात घोळवुन गॅसवर कढईमध्ये गरम तेलात सोडा.
बटाटे वड्यांना सोनेरी रंग येईपर्यत खुसखुशीत तळून घ्या.