Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांना रोज नाश्त्याला पौष्टीक पदार्थ देणे त्याची वाढीसाठी चांगले आहे.
चला तर पाहुया मुगाचं कढण किंवा सूप करण्याची रेसिपी.
हिरवे मूग, तूप, जिरे, हिंग, कोथिंबीर,सैंधव मीठ इ.
सगळ्यात आधी मूग रात्रभर मूग भिजत घाला.
दुसऱ्या दिवशी ते मूगात जास्त पाणी घालून ते उकडवून घ्या.
मूग उकडायला ठेवताना त्यामध्ये मीठ घाला.
मुग नरम शिजल्यावर ते बाजूला ठेवून फोडणीसाठी पातेलं गरम करा.
पातेल्यात तूप गरम करा. त्यात जिरं आणि हिंगाची चुरचुरीत फोडणी द्या. उकडवलेल्या मुगामध्ये फोडणी घालून गरमा गरम सर्व्ह करा. तुम्ही हे मूग डाएटसाठी खाऊ शकता.