Manasvi Choudhary
सकाळी हेल्दी आणि टेस्टी नाश्ता केला जातो. नाश्ता केल्याने दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते.
नाश्त्यासाठी मुसली ही ओट्स, सुकामेवा, बिया आणि फळे असा पौष्टिक पदार्थ आहे. मुसली आरोग्यासाठी पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे.
मुसली मध्ये फायबर, प्रथिने आणि खनिजे भरपूर असतात म्हणून मुसली शरीरासाठी फायदेशीर आहे.
मुसलीमध्ये तुम्ही थंड किंवा गरम दूध देखील मिक्स करून खाऊ शकता. मुसली मध्ये सुकवलेली फळे किंवा ताजी फळे कापून टाकल्याने चव येते.
मुसली हा एक पौष्टिक नाश्ता आहे यामुळे बर्याच काळासाठी आपले पोट भरलेले राहते शरीराला उर्जा मिळते.
मुसलीमध्ये ओट्स हा एक महत्वाचा घटक आहे जो हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.
फायबरने भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.