Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्याला गरमा गरम पराठे खायला प्रत्येकालाच आवडतात.
मूग डाळच्या साहाय्याने तुम्ही हा पौष्टीक आणि सोप्या पद्धतीने पराठा तयार करू शकता.
गव्हाचे पीठ, मूग डाळ, कोथिंबीर, लाल मिरची, जिरे पावडर, गरम मसाला, मीठ, तेल, पाणी इ.
सगळ्यात आधी मूग डाळ उकडवून घ्या.
आता उकडलेली मऊ डाळ, कोथिंबीर आणि गव्हाचे पीठ मळून घ्या.
आता कणकेचे लहान लहान गोळे करून घ्या.
आता मसाले पराठ्याला लावून पोळी प्रमाणे लाटा.
पराठा गरम तव्यावर तेल लावून टम्म फुगवा आणि गरमा गरम सर्व्ह करा.