ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात मोठ्या संख्येने लोक नाश्त्यात इडली खातात.
सगळ्यात सोपा आणि चवीला उत्तम असा इडलीचा पौष्टीक नाश्ता कसा करायचा हे जाणून घेऊयात.
आपण इडली आणखी पौष्टीक करण्यासाठी मूगाच्या डाळीचा वापर करणार आहोत.
मूग डाळ, तांदूळ, उडदाची डाळ, अदरक, मीठ इ.
सर्वप्रथम मुग डाळ, तांदूळ, उडदाची डाळ वेगवेगळे पाण्यात भिजवून घ्या.
आता पुन्हा एकदा स्वच्छ धुवून मिक्सरला बारिक वाटून घ्या.
आता मिश्रणात चवीनुसार मीठ घालून इडलीच्या भांड्यात घाला.
त्यापुर्वी इडलीच्या भांड्याला तेल लावा. मग इडल्या पुर्ण पणे वाफल्यावर त्या व्यवस्थित काढा.
तयार आहेत तुमच्या पौष्टीक इडल्या. तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.